अन् बीएसएफ हवालदाराचाच झाला पोपट!


अन् बीएसएफ हवालदाराचाच झाला पोपट!
SHARES

परदेशातील पोपटांची होणारी तस्करी रोखताना पैशांच्या लालसेपोटी बीएसएफ हवालदाराचाच पोपट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोपटांची तस्करी करणाऱ्या एका तस्कराला वन्य जीवन संरक्षण विभागाच्या बीएसएफ हवालदाराने पकडलं, पण नियत फिरल्याने त्याने त्याला सोडण्याच्या बदल्यात ६५ हजारांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या आरोपीने बीएसएफ हवालदाराची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. यानुसार सापळा रचून या बीएसएफ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.


कसा सापडला तस्कर?

परदेशी पोपटांची तस्करी करणाऱ्या तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी दोन परदेशी पोपटांच्या विक्रीची जाहिरात 'लोकेन्स्टो' या संकेतस्थळावर टाकली होती. याबाबतची माहिती प्राणीप्रेमींकडून वन्य जीवन संरक्षण विभागाला मिळाली. त्यानुसार वन्य जीवन संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस गिऱ्हाईक उभे करून तस्करी करणाऱ्या व्यक्तीला मुलुंड येथील डी. मार्ट येथे बोलावलं.



नियत फिरली

त्यानुसार पोपटांची तस्करी करणारा व्यक्ती पोपटांसह तिथं आल्यानंतर वन्य जीवन संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर तस्कराला बेलापूर येथील कार्यालयात नेत असताना. बीएसएफ हवालदार शरद नेमसे (३१) यांनी तस्करावर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे ६५ हजारांची लाच मागितली. मात्र तस्कराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने फोनवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.



रंगेहात अटक

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तस्कराच्या मदतीने हवालदाराला ४५ हजार रुपये देण्याचं ठरलं. त्यानुसार सापळा रचून १५ हजारांची पहिली रक्कम घेताना बीएसएफ हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. निमसे विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.



हेही वाचा-

पत्रकार तुषार खरात यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका महिलेने नोंदवली लैंगिक छळाची तक्रार

डीएसकेंना कुठल्याही क्षणी अटक? न्यायालयात ५० कोटी रुपये न भरल्याने ओढवली आफत


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा