पत्रकार तुषार खरात यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका महिलेने नोंदवली लैंगिक छळाची तक्रार

तुषार खरातच्या जाचाला कंटाळूनच आपण दैनिकातील नोकरी सोडल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाकडेही लक्ष केंद्रीत केलं असून तुषार यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पत्रकार तुषार खरात यांच्या अडचणीत वाढ, आणखी एका महिलेने नोंदवली लैंगिक छळाची तक्रार
SHARES

महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैनिकात वरिष्ठ पत्रकार तुषार खरात यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. कारण त्यांच्याविरोधात आणखी एका महिलेने माता रमाबाई पोलीस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार नोंदवली आहे. तुषार खरातच्या जाचाला कंटाळूनच आपण दैनिकातील नोकरी सोडल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाकडेही लक्ष केंद्रीत केलं असून तुषार यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


लैंगिक छळ आणि मानसिक त्रास

राज्यातील एका नामांकीत वृत्तपत्राच्या 'एसआयटी' विभागाचे प्रमुख असलेल्या तुषार खरात यांच्यासोबत ही पीडित महिला काम करत होती. त्यावेळी तुषारकडून वेळोवेळी लैंगिक छळ आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्याबाबत वरिष्ठांकडे सातत्याने दाद मागूनसुद्धा मदत मिळाली नाही. त्यामुळे तुषारच्या रोजच्या जाचाला कंटाळून अखेर आपण नोकरी सोडली होती.

त्यावेळी भलेही काही कारणास्तव पोलिसांत तक्रार नोंदवली नसली, तरी तुषार विरोधात समूहातील एका महिलेने तक्रार नोंदवल्याचं कळाल्यानंतर पीडितेने पुढे येऊन मंगळवारी तुषारच्या जाचाला बळी पडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

या प्रकरणी माता रमाबाई पोलिसांनी पीडित महिलेची मंगळवारी रात्री तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणात पोलीस तुषारला पाठीशी घालत, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाचा पारदर्शक तपास पोलिसांनी करावा, असा पत्रव्यवहार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. तुषारविरोधात आलेल्या दुसऱ्या तक्रारीनंतर पोलीस आता त्याला केव्हाही अटक करू शकतात, असं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.



हेही वाचा-

वरिष्ठ पत्रकारावर विनयभंगाचा गुन्हा

अभिनेत्री झायरा वासिम विनयभंगप्रकरणी विकास सचदेवला जामीन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा