वरिष्ठ पत्रकारावर विनयभंगाचा गुन्हा


वरिष्ठ पत्रकारावर विनयभंगाचा गुन्हा
SHARES

महाराष्ट्रातल्या एका नामांकीत वृत्त समूहातील वरिष्ठ पत्रकार तुषार खरात यांच्याविरोधात समूहातील एका महिला पत्रकाराने लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मागील २ वर्षांपासून पीडित महिला वृत समूहाच्या 'एसआयटी' विभागात काम करत होती. गेल्या काही महिन्यांपासून तुषार पीडितेचा लैंगिक व मानसिक छळ करत होता. याबाबत पीडितेने समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार नोंदवत दाद मागितली. मात्र या घटनेची माहिती मिळताच तुषारने पीडितेवर नोकरीचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.



अखेर वृत समूहाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्रस्त महिला पत्रकाराने रविवारी वकिलांमार्फत माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याचं झोन १ चे पोलीस उपायुक्त मनोज कुमार शर्मा यांनी सांगितलं.


काही महिन्यांपासून आरोपी तक्रारदार महिला पत्रकाराचा लैंगिक व मानसिक छळ करत होता. याबाबत महिलेने संबधित वृत्त समूहाकडे तक्रार नोंदवली होती. तसेच या प्रकरणी रविवारी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

- अॅड. हरिहर भावे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा