अभिनेत्री झायरा वासिम विनयभंगप्रकरणी विकास सचदेवला जामीन


अभिनेत्री झायरा वासिम विनयभंगप्रकरणी विकास सचदेवला जामीन
SHARES

'दंगलगर्ल' अभिनेत्री झायरा वासिमचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी विकास सचदेव याला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या दिंडोशी कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. २५ हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर सचदेव याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने सचदेव यांना अनेक शर्थी घातल्या असून त्यांचं काटेकोरपणे पालन सचदेव याला करावं लागणार आहे.


काय होती घटना?

९ डिसेंबर रोजी विमानाने दिल्लीहून मुंबईला येत असताना मागच्या सीटवर बसलेला आरोपी विकास सचदेवने आपल्या पायाला स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार झायराने केली होती. एवढंच नव्हे, तर झालेला प्रकार झायराने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.


'अशी' झाली अटक

या इन्स्टाग्रामची दखल घेत महिला आयोगाने पोलिसांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी झायराचा सविस्तर जबाब नोंदवून विकासविरोधात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याच्या काही तासांत सहार पोलिसांनी विकासला अटक केली.

दरम्यान, विकासने कोणताही गैरप्रकार केला नसून विमानात पाय लागल्यावर त्याने झायराची माफी मागितल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं होतं.हेही वाचा-

झायराच्या जागी असते तर त्याचा पायच तोडला असता! - कंगना रणौत

'दंगल' फेम झायरा वसिमसोबत विमानात छेडछाड

झायरा वासिम विनयभंग प्रकरण : विकास सचदेवला न्यायालयीन कोठडी


संबंधित विषय