Advertisement

झायराच्या जागी असते तर त्याचा पायच तोडला असता! - कंगना रणौत


झायराच्या जागी असते तर त्याचा पायच तोडला असता! - कंगना रणौत
SHARES

झायरा वसिम हिचा विमानात विनयभंग झाल्यानंतर बाॅलीवुडचे अनेक जण तिच्या समर्थनासाठी पुढं अाले अाहेत. त्यात अाता बाॅलीवुडची क्वीन कंगना रणौत हिचीही भर पडली अाहे. त्या व्यक्तीनं फक्त झायराच्या सीटवर पाय ठेवला होता, असं लोकांचं म्हणणं अाहे. पण माझ्यासाठी ते अाक्षेपार्ह अाहे. तिच्या जागी मी असते तर त्याचा पायच तोडला असता, अशी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त करत कंगनानं झायराला पाठिंबा दर्शवला अाहे.


मी बिनधास्त गर्ल

या लहान मुलीसोबत जे काही घडले ते संतापजनक अाहे. याबाबतीत झायराला पाठिंबा देण्याएेवजी लोकं या घटनेची चर्चा करत अाहेत, अनेक प्रश्न उपस्थित करत अाहेत. कोणत्याही विषयावर बोलायला मी कधीच घाबरत नाही. माझं जे काही मत असतं, ते मी बिनधास्तपणे मांडत असते, असंही कंगनानं सांगितलं.


काय अाहे प्रकरण?

गेल्या अाठवड्यात एअर विस्ताराच्या विमानानं दिल्लीहून मुंबईला येत असताना तिच्या मागे बसलेल्या सहप्रवाशाने झायराच्या सीटवर पाय ठेवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत उतरल्यानंतर झायरानं या घटनेचा व्हिडियो इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर बराच वादंग झाला. अखेर मुंबई पोलिसांनी या विनयभंगप्रकरणी अारोपी विकास सचदेवला अटक केली होती.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा