'दंगल' फेम झायरा वसिमसोबत विमानात छेडछाड


'दंगल' फेम झायरा वसिमसोबत विमानात छेडछाड
SHARES

'दंगल' अाणि 'सिक्रेट सुपरस्टार' फेम झायरा वसिम हिच्यासोबत विमानात छेडछाड झाल्याची धक्कादायक बाब समोर अाली अाहे. अापल्या सीटमागे बसलेल्या सहप्रवाशाने तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. एअर विस्ताराच्या विमानातून दिल्ली ते मुंबईदरम्यानच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला असून त्याबाबतचा व्हिडियो झायरानं अापल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला अाहे. अापल्यायावर घडलेल्या या वाईट प्रकाराची अापबिती व्हिडियोद्वारे सांगताना तिला रडूही कोसळलं होतं.

विमानातील क्रू मेंबर्सकडे याबाबत तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. याबाबत अाता हवाई वाहतूक मंत्रालयानं विस्तार एअरलाईन्सकडून सविस्तर तपशील मागवला अाहे. १७ वर्षीय झायरा प्रवासादरम्यान झोपली असताना मागच्या सीटवरील व्यक्ती तिच्या सीटवर अापला पाय टाकून बसला होता. तो पायाद्वारे तिच्या पाठीला अाणि मानेला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा मी फोटाे काढण्याचा प्रयत्न करत होती, पण अंधुक प्रकाशामुळे फोटो नीट येत नव्हता.


मुलींची अशीच काळजी घेणार का?

मुंबईला उतरल्यानंतर झायरानं इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ''एखाद्या महिलेशी असं वागणं चुकीचं अाहे. कोणत्याही मुलीसाठी असा स्पर्श भयावह असतो. ५ ते १० मिनिटं हा प्रकार सुरू होता. त्याच्या या असभ्य वर्तणुकीमुळे माझा दोन तासांचा प्रवास त्रासदायक बनला. हे चुकीचं अाहे. याप्रकारे तुम्ही मुलींची सुरक्षा करणार अाहात का? कोणत्याही मुलीसोबत असा प्रसंग घडू नये. हे सर्व भयावह अाहे,'' अशा शब्दांत झायरानं नाराजी व्यक्त केली.पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या गंभीर प्रकरणानंतर सहार पोलिसांनी झायराच्या हाॅटेलमध्ये जाऊन तिची साक्ष नोंदवण्यात अाली अाहे. झायरानं दिलेल्या जबानीनंतर, सहार पोलिसांनी
२ एफ या सीटवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. पोलिसांनी कलम ३५४ अाणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला अाहे.


डीजीसीए करणार चौकशी - महिला अायोग

हा प्रकार लाजीरवाणा असून महिला अायोग झायराच्या पाठीशी अाहे. मुंबई पोलिसांनी यात लक्ष घालावे, असे निर्देश देण्यात अाले अाहेत. दोषी व्यक्तीवर कारवाई व्हायलाच हवी. विमानातून अनेक प्रवासी प्रवास करत असतानाच, कुणीही या प्रकाराला विरोध केला नाही, हे खेदजनक अाहे, असं महाराष्ट्र राज्य महिला अायोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलं. डीजीसीएने याबाबत चौकशी करावी, यासाठी राज्य महिला अायोगाने पावली उचलली अाहेत.


विस्तारा एअरलाईन्सही खडबडून जागे झालं

Official Statement: Update #2 pic.twitter.com/9VQOjzGTOK

— Vistara (@airvistara) 10 December 2017 ">


व्हिडियो प्रसारित झाल्यावर मोठा वादंग उठल्यानंतर विस्तारा एअरलाईन्सला जाग अाली असून अाम्ही अशाप्रकारचं कोणतंही वर्तन खपवून घेणार नाही. अाम्ही झायराच्या पाठीशी अाहोत. अाम्ही या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत अाहोत, असं विस्तारा एअरलाईन्सनं म्हटलं अाहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा