जानू...चल ना चोरी करते है!


जानू...चल ना चोरी करते है!
SHARES

मुंबई सेंट्रल - रेल्वेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरी करणाऱ्या एका सराईत महिला चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सुनीता जानू असं या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून जीआरपीने पाच मोबाइल फोन जप्त केले आहेत. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी ही महिला बुरखा घालत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

मागील काही दिवसांपासून पश्चिम रेल्वेतील महिलांच्या डब्ब्यात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अशातच मुंबई सेंट्रल जीआरपीच्या निर्भया पथकाला एक महिला चोर दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी सापळा रचून सुनीता जानू नावाच्या या महिलेला अटक केली.

या महिलेकडून जीआरपीने पाच फोन जप्त केले असून तिच्याविरोधात इतर पोलीस ठाण्यात आणखीन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती जीआरपीने दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा