आरेमध्ये प्रेयसीसमोरच प्रियकराने केली आत्महत्या

Aarey Colony
आरेमध्ये प्रेयसीसमोरच प्रियकराने केली आत्महत्या
आरेमध्ये प्रेयसीसमोरच प्रियकराने केली आत्महत्या
See all
मुंबई  -  

वैयक्तिक भांडणातून प्रियकराने प्रेयसीच्या समोरच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंबईतल्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी 11:30 वाजता घडली. ते दोघेही कुर्लातल्या जरी मरीतले रहिवासी होते.

सना खान (20) ही अंधेरीतल्या कॉलसेंटरमध्ये कामाला असून ती गुरुवारी सकाळी 10 वाजता घरातून कामाला जाण्यासाठी निघाली होती. याच दरम्यान प्रियकर आशिफ शेख (22) याने अंधेरीतल्या साकीनाकापर्यंत प्रेयसी सनाचा पाठलाग करत तिला कामावर जाण्यापासून रोखले असता घरातले आपला पाठलाग करत असल्याचे सनाने सांगितले. मात्र प्रेयसी आपले म्हणणे ऐकत नसल्याने प्रियकर आशिफने तिला अंधेरीतल्या साकीनाका बसमधून उतरण्यास सांगितले आणि तो तिला रिक्षात बसवून आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या छोटा काश्मिर गार्डनमध्ये नेले. त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप वेळापर्यंत वाद सुरू होते. त्यानंतर प्रियकराने संतापाच्या भरात प्रेयसीवर दगडफेक केली. ज्यामध्ये ती जखमी झाली. त्यावेळी ती रडू लागली. ते पाहून त्याने प्रेयसीच्या ओढणीने झाडाला घळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र प्रेमिकेने जेव्हा पाहिले तोपर्यंत फार उशीर झाला होता.

सनाने तिथल्या उपस्थितांच्या मदतीने आशिफला झाडावरून खाली उतरवले. पण तोपर्यंत तो मृत पावला होता. तिथल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना फोनवरून दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.