Advertisement

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

दिवसभरात ४०२६ नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही १८,५९,३६७वर गेली आहे.

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ
SHARES

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ कायम आहे. मंगळवारी ६३६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही १७,३७,०८० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४०२६ नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही १८,५९,३६७वर गेली आहे. तर ५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत ४७,८२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचाः- ‘नो मराठी’, ‘नो अॅमेझाॅन’, मनसे पुन्हा आक्रमक

देशात कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (८ डिसेंबर २०२०) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत २६,५६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ३८५ हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४.१० टक्के केसेस ॲक्टिव्ह आहेत. ९४.४५ टक्के कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १.४५ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३,८३,८६६ रुग्ण ॲक्टिव्ह असून ९१,७८,९४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा