मल्लखांबाचा दोर ठरला मृत्यूचा फास

  Mumbai
  मल्लखांबाचा दोर ठरला मृत्यूचा फास
  मुंबई  -  

  मंगळवारी मुंबईच्या वरळी परिसरात एक विचित्र प्रकार घडला. दोरीच्या मल्लखांबाचा सराव करत असताना 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनाली बारीया असं या मुलीचं नाव आहे. ती सराव करत असलेली दोरी तिच्या गळ्याभोवती आवळली आणि तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सोनाली एकटीच घरीच होती. कुटुंबिय बाहेर गेलं होतं..दुपारी लहान भाऊ घरी आल्यावर सोनाली दोरीला लटकलेली आढळली..त्याने लगेचच शेजारच्यांना बोलावून घेतलं. आणि सोनालीला रुग्णालयात दाखल केलं..मात्र तोपर्यंत उशीर झाला होता..आठवीत शिकत असलेली सोनाली दोन महिन्यांपासून दोरीवरच्या मल्लखांबाचा सराव करत होती..मात्र याचं दोरीनं तीचा जीव घेतला..या प्रकरणी वरळी पोलिसांनी एक्सिडेंटल डेथ चा गुन्हा नोंदवला असून सोनालीची आई तसेच आजीचा जबाब नोंदवला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.