चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला अटक

Palghar
चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला अटक
चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला अटक
चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला अटक
See all
मुंबई  -  

एका 10 वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या 56 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. जमील अहमद अन्सारी असे या नराधमाचे नाव आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील आनंद नगर परिसरात घडली असून, या नराधमाचे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही 10 वर्षीय चिमुरडी घरासमोर लहान मुलांसोबत खेळत होती. त्याच दरम्यान जमील अहमद अन्सारी याची नजर तिच्यावर पडली. हा नराधम तिच्याजवळ गेला आणि तिला स्वत: कडे खेचून तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. दरम्यान, या नराधमाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने अन्सारी विरोधात माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच पोलिसांनी या नराधमावर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.