चिकूच्या बागेत एका व्यक्तीची हत्या

 Mumbai
चिकूच्या बागेत एका व्यक्तीची हत्या

चिकूच्या बागेत एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत वसंत झोप (50) हे कक्राडा डोंगरीपाडातले रहिवासी होते. 17 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास वसंत यांच्या घराच्या बाहेर चिकूच्या बागेत अज्ञात आरोपींनी लाकडी दांड्याने त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. याबाबत माहिती मिळताच शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी कॉटेज रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना यासदंर्भात माहिती मिळताच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading Comments