कुर्ल्यात तरूणाला नग्न करून मारहाण, व्हिडिओही केला व्हायरल

पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून कुर्ल्यात राहणाऱ्या एका तरुणाला नग्न करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता त्या तरुणाचा नग्न व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करत त्याची बदनामी देखील केली.

कुर्ल्यात तरूणाला नग्न करून मारहाण, व्हिडिओही केला व्हायरल
SHARES

पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून कुर्ल्यात राहणाऱ्या एका तरुणाला नग्न करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता त्या तरुणाचा नग्न व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करत त्याची बदनामी देखील केली. या प्रकरणी कुर्ल्याच्या नेहरूनगर पोलिसांनी १७ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलासह ३ जणांना अटक केली आहे.


काय आहे घटना?

मूळचा जयपूरच्या अजमेर येथील राहणारा तक्रारदार विशाल जैलंया (२६) याचे २ वर्षांपूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबध होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रेमसंबधांना विरोध करत मुलीचं लग्न टिनू देवाशिया नावाच्या तरूणाशी लावून दिलं. कालांतराने टिनू मुलीला घेऊन मुंबईच्या कुर्ला परिसरात राहू लागला. मात्र त्याची पत्नी लग्नानंतरही विशालच्या संपर्कात होती. विशालही कुर्ला भागात रहायला आला होता. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती टिनूला कळाल्यानंतर टिनूने विशालला आपल्या पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.


संशयाने केला घात

त्यानंतर विशाल टिनूच्या पत्नीशी कायमचा संपर्क तोडून गावी स्थायिक झाला. मात्र गावात रोजगार नसल्यामुळे नाईलाजास्तव विशाल पुन्हा मुंबईला नोकरीच्या शोधात कुर्ला येथील नातेवाईकांच्या घरी येऊन राहू लागला. विशाल पुन्हा मुंबईत आल्याचं कळाल्यानंतर टिनूने त्याच्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. त्यातूनच १५ फेब्रुवारी रोजी टिनूने विशालला आपल्या घरी बोलावून घेतलं. विशाल घरी गेल्यानंतर टिनू आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी विशालला चांगलाच चोप दिला.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी विशालला नग्न करत मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ काढून तो टिनूने सर्व सोशल मीडियवर टाकून विशालची बदनामी केली. हा व्हिडिओ व्हायरल होत विशालच्या गावापर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी विशालला घराचे दरवाजे कायमचे बंद केले तसंच गावकऱ्यांनीही त्याला टोमणे मारण्यास सुरूवात केली.


एकाच दिवसात अटक

त्यानंतर आपल्यावर झालेला अन्याय आणि चुकीच्या आरोपांमुळे झालेली बदनामी पुसण्यासाठी विशालने १७ फेब्रुवारी रोजी कुर्लाच्या नेहरूनगर पोलिस ठाण्यात टिनू देवाशियासह तिघांवर विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानुसार नेहरू नगर पोलिसांनी एक अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात भादंवी कलम ३६७, ३४२, ३२६, ५०६, ३४ आणि आयटी अॅक्ट ६६ (अ) व ६७ कलमांतर्गत गुन्हा नोंदवत त्याच दिवशी अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा