शेअर मार्केट कोसळल्यानं वृद्धाने केली आत्महत्या


शेअर मार्केट कोसळल्यानं वृद्धाने केली आत्महत्या
SHARES

मुंबईच्या शेअर मार्केटमध्ये आलेल्या भूकंपामुळे अनेकांचं लाखोंचं नुकसान झालं. मात्र झालेल्या नुकसानामुळे हताश झालेल्या 63 वर्षीय वृद्धाने कांदिवली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय नाईक असं या मृत व्यक्तीचं नाव आहे.

जमापुंजी शेअर मार्केटमध्ये गुंतवली

नाईक हे कांदिवलीतील जिमखाना रोड, पोइसर येथील पुष्पांजली इमारतीत राहतात. एका खासगी कंपनीत कामाला असलेले विजय हे काही महिन्यांपूर्वीच निवृत्त झाले. तेव्हापासून ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. आपल्या आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवली होती. 


मानसिक तणावातून आत्महत्या

गुरूवारी शेअक मार्केटमध्ये कमालीची उलाढाल झाली. शेअर मार्केट पडल्याचं कळताच, नाईक मानसिक तणावात गेले. नैराक्षेतबन मुलगी कामावर गेल्यानंतर आणि पत्नी मंदिरात गेल्यानंतर त्यांनी घराच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दुपारच्या वेळेस घरकाम करण्यासाठी मोलकरीण आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांत अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा