दगडाने ठेचून मित्राची हत्या


दगडाने ठेचून मित्राची हत्या
SHARES

दोन मित्रांमध्ये क्षुल्लक कारणांवरून झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना चर्चगेट परिसरात उघडकीस आली. विक्रम रकम निनामा(२२) असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत हत्येचा छडा लावला.


संपूर्ण प्रकार

आयकर भवन येथील महर्षी कर्वे रोड परिसरात बस थांब्यावर विक्रम आणि रामस्वामी कोणार हे दोघे गप्पा मारत होते. अचानक काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला. आणि हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात दोघांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. दोघेही नशेत होते. त्यावेळी कोणारने निनामाच्या डोक्‍यात पेव्हर ब्लॉक आणि फरशी घालून त्याची हत्या केली. याप्रकरणाचा छडा लावून आझाद मैदान पोलिसांनी विजय मुत्तू स्वामी देवर ऊर्फ मुत्तूस्वामी रामस्वामी कोणार(६५) याला अटक केली आहे. दोघेही मित्र असून दोघांमध्ये झालेल्या वादानंतर कोणारने हा प्रकार केल्याचं चौकशीत पुढे आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा