सुमित राघवनच्या पत्नीसमोर अनाहुताचे विकृत चाळे; विकृताचा शोध सुरू


सुमित राघवनच्या पत्नीसमोर अनाहुताचे विकृत चाळे; विकृताचा शोध सुरू
SHARES

अभिनेता सुमित राघवन यांच्या पत्नीसोबत मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे सुमित राघवन संतप्त झाले असून त्यांनी तशी एक पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर टाकली आहे. मुंबई पोलिसांनीही लागलीच त्यांच्या ट्विटर पोस्टची दखल घेत त्वरीत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.


हा प्रकार सकाळी घडला. या विषयी मी विलेपार्ले पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मला पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लवकरच त्या माणसाला शोधण्यात यश येईल.

सुमित राघवन, तक्रारदार


बीएमडब्ल्यू चालकाचे विकृत चाळे

अभिनेता सुमित राघवन यांची पत्नी अभिनेत्री चिन्मयी सुमित सोमवारी सकाळच्या सुमारास विलेपार्ले परिसरातून जात होत्या. नेमका याच वेळी एका बीएमडब्ल्यू कारचा चालक त्यांच्याकडे पाहून अश्लिल हावभाव करू लागला. एवढंच नाही, तर त्याने थेट त्यांच्याकडे पाहून हस्तमैथुन करायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार दिवसा ढवळ्या सुरु होता!


सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकार कैद

चिन्मयी सुमित यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सदर विकृत व्यक्तीच्या दिशेने धाव घेत त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच या विकृताने तिथून पळ काढला. यासंदर्भात अभिनेता सुमित राघवन यांनी पोलिसात तक्रार केली आहे. सदर बीएमडब्ल्यू गाडीचा पूर्ण क्रमांक चिन्मयी सुमित यांना घेता आला नाही. मात्र, १९८५ हे त्या क्रमांकाचे शेवटचे आकडे होते, असं सुमित राघवन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

पोलिस ठाण्यात भा.द.वि. 354 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच गाडीचा नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

लक्ष्मण चव्हाण, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, विलेपार्ले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा