SHARE

चेंबूर - अल्पवयीन भावाने आपल्या गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पी.एल.लोखंडे मार्गावरील मालेकरवाडी परिसरात घडली आहे. पीडित गतिमंद मुलगी दहा वर्षांची असून, ती घरात एकटीच असताना 14 वर्षीय भावाने तिच्यावर बलात्कार केला. या मुलीने ही बाब आईस सांगितल्यावर आईने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या