गायक मिक्का सिंगच्या मँनेजरने स्टुडिओत केली आत्महत्या

सौम्या हिने शुक्रवारी झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले. सौम्याचा मोबाइल ती उतलत नसल्यामुळे तिच्या ओळखिच्या व्यक्तींनी स्टुडिओत आल्यावर त्यांना सौम्या बेशुद्ध अवस्थेत मिळाली.

गायक मिक्का सिंगच्या मँनेजरने स्टुडिओत केली आत्महत्या
SHARES
बाँलीवूडचा प्रसिद्ध गायक मिक्का सिंगच्या मँनेजरने शुक्रवारी स्टुडिओतच आत्महत्या केली. सौम्या सोएब खान (28) असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती स्टुडिओतच वास्तव्याला होती. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंधेरी 4 बंगलायेथील एस.व्ही.पीनगर येथील म्हाडा काँलनीत मिक्का सिंग याचे स्टुडिओ आहे. या स्टुडिओतच सौम्या ही रहात होती. स्टुडिओच्या शूटचे सर्व रेकाँर्डिंग बुकींगचे काम ती पहायची. माञ मागील अनेक दिवसांपासून ती नैराक्षेत होती. यातून सौम्या हिने शुक्रवारी झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले. सौम्याचा मोबाइल ती उतलत नसल्यामुळे तिच्या ओळखिच्या व्यक्तींनी स्टुडिओत आल्यावर त्यांना सौम्या बेशुद्ध अवस्थेत मिळाली.

सौम्याला उपचारासाठी कोकीळाबेन रुग्णालयात नेले असता. डाँक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती स्टुडिओचा मालक मिक्का सिंग याला मिळाल्यानंतर त्याने घटनास्थळी घाव घेतली. पोलिस ही त्या ठिकाणी आले. सौम्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ठ असून पोलिस या प्रकरणी अध्क तपास करत आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा