अल्पवयीन मुलीची गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी ही मुलगी सोसायटीच्या चेअरमनच्या घरी गेली होती. त्यांच्या पत्नीकडून तिने गच्चीची चावी मागितली.

अल्पवयीन मुलीची गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या
SHARES

एका अल्पवयीने मुलीने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दादरमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. 

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या केलेली मुलगी १५ वर्षीय होती.  घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांना घटनास्थळी कसलीही सुसाईड नोट सापडली नाही. मुलीने आत्महत्या का केली याबाबत कोणतंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं की, आत्महत्या करण्यापूर्वी ही मुलगी सोसायटीच्या चेअरमनच्या घरी गेली होती. त्यांच्या पत्नीकडून तिने गच्चीची चावी मागितली. कपडे सुकत घालायचे आहेत असं कारण तिने यावेळी सांगितलं. त्यानंतर तिने गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या केली. 

पोलीस मृत मुलीच्या कुटुंबियांची आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. आत्महत्येमागे अजून काही वेगळं कारण तर नाही या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा