दीड महिन्यानंतर सापडला चिमुरडा

 wadala
दीड महिन्यानंतर सापडला चिमुरडा

वडाळा - सीएसटी-चेंबूर लोकलमधून 1 जानेवारीला हरवलेला धनंजय जगदीश भावसार (वय 4) अखेर सापडला आहे. मुंबईतल्या गावदेवी परिसरातून धनंजयला शोधून काढण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.

धनंजयला शोधण्यासाठी वडाळा लोहमार्ग पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी अनेक स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज शोधले. दीड महिन्यानंतर 13 फेब्रुवारीला या चिमुरड्याचा शोध लागला. हा मुलगा एका अनोळखी महिलेसोबत गावदेवी शहर हद्दीत भटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गावदेवी परिसरात सापळा लावून संशयित महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतलं. धनंजय लोकलमध्ये सापडल्याचे या महिलेने सांगतिले. धनंजयची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले.

1 जानेवारीला धनंजय आईसोबत लोकलने प्रवास करत होता. त्यावेळी त्याची आईसोबत ताटातूट झाली. शोधाशोध करूनही धनंजय कुठेच सापडला नाही. धनंजयच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. यादरम्यान धनंजयच्या आईचे निधन झाले. पण धनंजयच्या आत्याने पोलिसांकडे जाऊन वारंवार पाठपुरावा केला होता.

Loading Comments