गेला गोविंदास कुणीकडे?

 Dalmia Estate
गेला गोविंदास कुणीकडे?

मुलुंड - येथून 2 जानेवारीला बेपत्ता झालेल्या गोविंदास रावत या 14 वर्षीय मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. गोविंदास बेपत्ता होऊन तब्बल बारा दिवस उलटले तरी त्याचा शोध घेण्यास मुलुंड पोलिसांना यश मिळाले नाही. गोविंदासची शाळा, सर्व रुग्णालये, नातेवाईकांकडे त्याचा शोध घेतला तरी गोविंदासचा शोध लागलेला नाही. गोविंदासच्या घरी काही भांडण होते का? या बाजूंचाही विचार शोधकार्यात केला जातोय. गोविंदासच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व माहिती आता उघड करणे शक्य नाही परंतु गोविंदासचं शोधकार्य सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

Loading Comments