मानखुर्दमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

 Cheetah Camp
मानखुर्दमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू

ट्रॉम्बे - मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये रविवारी सकाळी नाल्यालगत एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. संजना शेख(35) असे या महिलेचे नाव असून, ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या बहिणीने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून, महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे शवविच्छेदनाच्या हवालानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

Loading Comments