आई रागावली म्हणून...

 Chembur
आई रागावली म्हणून...

चेंबूर - पालक रागावले तर मुले रुसतात, अबोला धरतात, रडून घरात गोंधळ घालतात. पण आई रागावल्याने दोन अल्पवयीन मुली घर सोडून गेल्याची धक्कादायक घटना चेंबूरमधील महात्मा फुले नगर परिसरात घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी या मुलींचा शोध घेऊन चौकशीनंतर त्यांना मंगळवारी आईच्या हवाली केले आहे.

महात्मा फुले नगर परिसरातील दोन सख्ख्या बहिणी 26 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. 17 आणि 15 वर्षे वय असलेल्या या दोघीही क्लासला जाण्यासाठी घरातून निघाल्या. मात्र पुन्हा घरी परतल्याच नाहीत. याबाबत मुलींच्या आईने २९ सप्टेंबरला चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केला.

दरम्यान, त्या मोबाईलवरून एका मुलाच्या सतत संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी त्या मुलास ताब्यात घेउन, चौकशी केली. या चौकशीत दोन्ही मुली रत्नागिरी येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी या मुलींशी संपर्क साधत त्यांना चेंबूरमध्ये बोलावले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आई रागवल्याने आपण घर सोडून गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली.

Loading Comments