रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोर जेरबंद

 wadala
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोर जेरबंद

लोकल ट्रेनमधून उतरणाऱ्या एका महिला प्रवाशाचा मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला आरपीएफ पोलिसांनी टिळक नगर रेल्वे स्थानकावर रंगेहाथ पकडले. खारघर येथे रहाणारी महिला प्रवासी बुधवारी दुपारी टिळक नगर रेल्वे स्थानकात उतरली. याच वेळी आरोपी फिरोज शेख (30) याने या महिलेचा मोबाईल तिच्या बॅगमधून काढला. त्यावेळी कुर्ला आरपीएफचे एस. आय. आर. सी. कुंटल हे स्थानकावर गस्त घालत होते. त्यांनी हा प्रकार पाहताच तत्काळ या आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ या महिलेचा मोबाईल मिळून आला. त्यानुसार आरपीएफने या आरोपीला वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.

Loading Comments