विद्यार्थ्याच्या हातून साफसफाई, संस्थेच्या सरचिटणीसाला अटक


विद्यार्थ्याच्या हातून साफसफाई, संस्थेच्या सरचिटणीसाला अटक
SHARES

'आमच्या इथे बालकामगार काम करत नाहीत' अशी पाटी मुंबईत अनेक ठिकाणी लावलेली दिसते. त्यामुळे मुंबईत बाल कामगार नाहीत, अशी अनेकांची समजूत हाेते. मात्र या पाटीमागचं सत्य वेगळंच आहे. मुंबईत छुप्या पद्धतीने बालकामगार काम करत असल्याचं वास्तव एखाद्या हाॅटेलात किंवा कंपनीत नव्हे, तर मरीन लाईन्सच्या 'मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन' या विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात उघड झालं आहे. याप्रकरणी असोसिएशनच्या सरचिटणीसाला अटक करण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?

'मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन' मध्ये एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाकडून जबरदस्तीने साफसफाई करण्याचं काम करून घेतलं जात होतं. या कामाचा मोबदला म्हणून त्याला अत्यंत तुटपूंजं मानधन देण्यात येणार होतं. गेल्या २० दिवसांपासून हा मुलगा नित्यमियमाने शाळेत येण्यासोबत शाळेतील स्वच्छेेतेची कामे करत होता.

ही बाब सामाजिक कार्यकर्ते गौरव शर्मा यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिसांच्या मदतीने या मुलाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे सरचिटणीस इजमॅरो फिग्रेजे यांना अटक केली आहे.


कसा आहे बाल कामगार कायदा?

बालकामगार प्रतिबंधक कायदा १९८६ साली करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत १४ वर्षांखलील मुलांना कोणत्याही उदयोग व्यवसायात काम करण्यास मनाई आहे. या मुलांना कामावर ठेवणं हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी ६ महिने ते २ वर्षे तुरुंगवास आणि २० ते २५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. २०१६ साली या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि १४ ते १८ वयोगटातील मुलांनाही या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आलं.


मी या मुलाला शाळेच्या साफसफाईचं काम करताना बघताच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.या मुलाची विचारपूस केल्यावरच त्याचं वय केवळ १५ वर्षे असल्याचं आणि
असोसिएशनच्या सरचिटणीसांनी त्याला अत्यल्प पगारावर कामाला ठेवल्याचं समजलं. ही ही बाब मी त्वरीत पोलिसांपर्यंत पोहोचवली. त्यानुसार मरीन लाईन्स पोलिसांनी येऊन त्यांना अटक केली.

- गौरव शर्मा, सामाजिक कार्यकर्ते

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा