भररस्त्यात तरुणीचा विनयभंग, एकाला अटक

तरुणीच्या मागावर असलेला फहीम रस्त्यात तरुणीला उद्देशून अश्लील शेरेबाजी करू लागला. ऐवढ्यावरच न थांबता तो तरुणीचे मागून केस ओढू लागला.

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग, एकाला अटक
SHARES

मुंबईच्या मालाड परिसरात २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम शेख असे आरोपीचे नाव असून तो मालवणी परिसरात राहणारा आहे. या प्रकरणी मालाड पोलिस अधिक तपास करत आहेत.

मालाड परिसरात १ जानेवारी २०२० रोजी घडली. पीडित तरुणी आपल्या बहिणीसोबत रात्री १० च्या सुमारास घरी परतत असताना.  मालाडच्या एका मॉलमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणारा फहीम तरुणीचा पाठलाग करू लागला. तरुणीच्या मागावर असलेला फहीम रस्त्यात तरुणीला उद्देशून अश्लील शेरेबाजी करू लागला. ऐवढ्यावरच न थांबता तो तरुणीचे मागून केस ओढू लागला. त्यावेळी तरुणीने फहीमला विरोध करत त्याच्या कानशिलात लगावली.

तरुणीने मदतीसाठी आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिक तरुणीच्या मदतीसाठी पुढे सरसावले. त्यावेळी फहिमने तिथून पळ काढला.  या प्रकरणी फहीमने दुसऱ्या दिवशी मालाडच्या  स्थानिक पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी फहिमला अटक केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा