लाँकडाऊनच्या नाकाबंदीत दुचाकीस्वाराने पोलिसाला नेले फरफटत


लाँकडाऊनच्या नाकाबंदीत दुचाकीस्वाराने पोलिसाला नेले फरफटत
SHARES
लॉकडाऊनच्या काळात डोंगरी येथील नाकांबदी चुकवण्यासाठी एका दुचाकीस्वाराने मुंबईतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला(एपीआय) अक्षरशः फरपटत नेल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यात जखमी झालेल्या पोलिस अधिका-याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.  याप्रकरणी खाजाबी शेख नईम(40) या दुचाकीस्वाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटिव्ही सध्या सोशल मिडियावर  वायरल होत आहे.


पी डिमेलो रोडवर हा प्रकार घडला. लाॅकडऊनच्या उल्लंघनाचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी  ईस्टर्न फ्रीवे वाडी बंदर डोंगरी येथे नाकाबंदी लावली होती. यावेळी सहाय्ाक पोलीस निरीक्षक धुरत यानी दुचाकीवरून जाणा-या दोघांना थांबण्यास सांगितले. पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच हे दुचाकीस्वार पळू लागले. हे लक्षात येताच धुरत यांनी दुचाकीचा हँडल पकडून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही न थांबता दुचाकीस्वाराने त्यांना फरफटत नेले.

यामध्ये धुरत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. मुंबईत करोनाचा फैलाव वाढल्याने सरकारने लाॅकडाऊन अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त वाढवली आहे. विनाकारण रस्त्यावर येणा-या वाहनांना आळा घालण्यासाठी नाकाबंदीही करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक अद्यापही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नसून पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. त्यातूनच हा पकार घडल्याने, पोलिसानी दुचाकीस्वाराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा