हत्तीच्या दातांची तस्करी करणारे अटकेत

घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील सर्वोद्य रुग्णालयाच्या बसस्टाँपजवळ हत्तीचे दात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती.

हत्तीच्या दातांची तस्करी करणारे अटकेत
SHARES


मुंबईच्या  घाटकोपर परिसरात हत्तीचे दात विकण्यासाठी आलेल्या दोघांना मुंबई गुन्हे अन्वेषण शाखा 7 च्या पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून हत्तीच्या दोन सुळ्यांचे तुकडे जप्त केले आहेत.  बिहार राज्यातून हत्तीचे दात आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, ते कुणाला विकणार होते, याविषयी अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.


 सचिन पासवान (26), सरोजकुमार उमाशंकर पासवान (24) अशी  या अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण  19 सप्टेंबर रोजी सकाळी घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील सर्वोद्य रुग्णालयाच्या बसस्टाँपजवळ   हत्तीचे दात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती  गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश तावरे  यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली. 

अडिच किलोचे हत्तीदंत जप्त

या दोघांकडून पोलिसांनी 2 किलो 141 ग्रँमचे हत्तीदंत जप्त केले आहेत. या दोघांविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात 39,45,45(अ), 59  वन्यजीव संरक्षन कायदा अन्वेय 1972 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेले हत्तीच्या दोन सुळ्यांचे  तुकडे वनविभागामार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हे दात अस्सल असल्याचे स्पष्ट झाले आहे. शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हत्तीच्या दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे. मात्र, दातांची किंमत जाहीर केल्यास दातांच्या तस्करीसाठी हत्तींची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यास बंदी घातली आहे, तरी अडीच लाखांच्या आसपास या दांतांची किॆमत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा