ताडदेव : दरोडा टाकलेल्या घराची मंगल प्रभात लोढांकडून पाहणी

रविवारी दिवसाढवळ्या टाकलेल्या दरोड्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी भेट दिली.

ताडदेव : दरोडा टाकलेल्या घराची मंगल प्रभात लोढांकडून पाहणी
SHARES

रविवारी ताडदेव इथल्या वृद्ध दाम्पत्याच्या घरी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी तारदेव येथील 70 वर्षीय पीडितेच्या घरी मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली.  

"मुंबईतील तारदेव येथे राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याच्या घरातून चोरी करून वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, येथे उपस्थित असलेल्या पोलिसांना या घटनेचा लवकरात लवकर तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा," लोढा यांनी ट्टिटरवर लिहिले आहे. 

तारदेव येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर तीन जणांनी दरोडा टाकला, यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मदन मोहन अग्रवाल (75) आणि सुरेखा अग्रवाल हे दाम्पत्य वडाळा येथे राहणारे आहेत. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. तारदेव पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून एफआयआर दाखल केला आहे.

मदन मोहन अग्रवाल आणि सुरेखा अग्रवाल हे तारदेव येथील यमाबाई काशिनाथ रोडवरील युसूफ मंझिलच्या तिसऱ्या मजल्यावर राहतात. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मदन मोहन अग्रवाल हे त्यांच्या नेहमीच्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. त्याच क्षणी, त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या तीन व्यक्तींनी अग्रवाल यांचे जबरदस्तीने अपहरण केले आणि त्यांना पुन्हा घरात नेले. त्यांच्या तोंडाला टेप लावण्यात आली आणि त्यांचे हातपाय बांधण्यात आले. पण तोंडावर टेप लावल्याने वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. 



हेही वाचा

तारदेवमध्ये भरदिवसा घरात दरोडा, श्वास गुदमरल्याने आजीचा मृत्यू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा