पीएमसी बँक गैरव्यवहारा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल

कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.

पीएमसी बँक गैरव्यवहारा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल
SHARES

नियमबाह्य कर्ज देत गैरव्यवहार केल्याप्रकरणी अखेर पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेचे पदाधिकारी आणि एचडीआयएल कंपनीच्या संचालकांविरुद्ध  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग व बँकेचे तसेच इतर पदाधिकारी, एचडीआयएल कंपनीचे संचालक वाधवा यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून सजबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पंजाब  अँड  महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं आहे. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जांची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती बँकेचे माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमस यांनी एचडीआयएलला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याची कबुली रिझर्व्ह बँकेसमोर दिली आहे. 

कर्जाची रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून सजबीर सिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भा.द.वि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४७१, १२० (ब), या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा