‘ओएलएक्सवर’ वाहन खरेदी करणं पडले महागात

शेख गाडी पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता, तेथे चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची ५० हजार किंमतीची सोन्याची चैन पळवली.

‘ओएलएक्सवर’ वाहन खरेदी करणं पडले महागात
SHARES

ओएलएस्कवर खरेदी विक्रीचा व्यवसाय सोपा असल्याची जाहिरात कंपनीकडून केली जात असली. तरी हे संकेतस्थळ तुम्हच्यासाठी खरंच योग्य आहे का ? हे पडताळून पाहणे तितकंच महत्वाचे आहे. मागील अनेक दिवसांपासून या संकेतस्थळावर खरेदीचा प्रयत्न करणाऱ्यांची फसवणूक झाल्याचे अनेक घटना पोलिस ठाण्यात नोंद आहे. याच संकेतस्थळावरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली आहे. सुरेश पद्मनाभन इसिकी तेवर (१९)फुलपंडी मरुगण (१९) अशी अटक करण्यात आरोपींचे नाव आहेत. 

ओएलएक्सवर या संकेतस्थळावर एक दुचाकी विकण्याबाबतची जाहिरात आरोपींनी दिली होती. त्यावरून वडाळा परिसरात राहणाऱ्या खासगी एजंट जहांगीर युनूस शेख हे दुचाकी खरेदी करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यावरून दुचाकी पाहून व्यवहार करण्यासाठी कोकरी आगार, म्हाडा चाळीजवळ शेख यांना आरोपींनी बोलावले. शेख गाडी पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता, तेथे चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची ५० हजार किंमतीची सोन्याची चैन पळवली. याबाबत वडाळा टिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटविण्यात आली. यातील काही आरोपी तमिळनाडू येथे पळून गेल्याचे पोलिस तपासात समजल्यानंतर एका विशेष पथकाने तमिळनाडू येथून दोन आरोपींना अटक केली तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा