ड्रोनच्या निशाण्यावर मुंबई !

 Pali Hill
ड्रोनच्या निशाण्यावर मुंबई !

मुंबई - उरी हल्ला, आणि त्यानंतर भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईक यामुळे मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. ड्रोन, रिमोट कंट्रोल, एरियल मिसाईल, पॅरा ग्लाइडर्सचा वापर करून मुंबईला लक्ष्य केले जाऊ शकते, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईत धारा १४४ लागू केली आहे. कोणत्याही स्वरूपाचे ड्रोन, रिमोट कंट्रोल, एरियल मिसाईल, पॅरा ग्लाइडर्स यांच्या उड्डाणाला मज्जाव केला आहे. हा आदेश ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहाणार आहे. या आदेशात मुंबई पोलिसांच्या ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या सर्व्हेलन्सला मात्र सूट देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढून याची माहिती दिली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading Comments