मुंबई विमानतळावर 'इंडियन मुजाहिदीन'कडून धमकीचा कॉल, यंत्रणा सतर्क

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर हा धमकीचा फोन आला आहे.

मुंबई विमानतळावर 'इंडियन मुजाहिदीन'कडून धमकीचा कॉल, यंत्रणा सतर्क
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर हा धमकीचा फोन आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअरपोर्ट कॉन्टेक सेंटरच्या संकेत स्थळावर सोमवारी १० च्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव इरफान अहमद शेख असे सांगितले. फोनवरील व्यक्तीने इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला. तसेच फोन कॉलवर त्याने संशयास्पद कोड भाषेत संवाद साधत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर आता संपूर्ण तपास यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ५०५(१) भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मुंबईवरील हल्ल्याची धमकी आली आहे. चार दिवसांपूर्वी देखील अशी एक धमकी आली होती. तालिबान प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी दिलेल्या आदेशावरून धमकी दिल्याचं मेलमध्ये म्हटलं होतं. अशात आता पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याने मुंबईकर चिंतेच आहेत.

4 फेब्रुवारीला देखील धमकीचा एक मेसेज आला होता. मुंबई पोलिसांना शनिवारी ट्विटरवर एक संदेश सापडला की, काही लोक 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत आहेत. या संदेशानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, @ghantekaking या वापरकर्त्याच्या नावाने मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विटरवरील संदेश वाचला की @indianslumdog शी संबंधित लोक सुरत, गुजरातमध्ये आहेत आणि ते 26/11सारखी योजना आखत आहेत.

@indianslumdog खाते कोण वापरत आहे याची संपूर्ण माहिती @ghantekaking कडे आहे असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

मात्र, गुन्हे शाखेच्या तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही. सध्या @indianslumdog हे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे.



हेही वाचा

उल्हासनगर: कुत्र्यावर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल

मुंबईत अलर्ट, 'या' भागात ड्रोन, पतंग उडवण्यास बंदी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा