पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येत्या १० फेब्रूवारीला पंतप्रधान मोदी मुंबई दौरा (Mumbai Visit) करणार आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा जाहीर झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
यासंबंधी मुंबई पोलिसांनी परिपत्रक काढले आहे, ज्यामध्ये त्यांनी या दौऱ्याविषयीच्या सुचना दिल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात मुंबई दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई एअरपोर्ट, आयएनएस शिक्रा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मरोळ आणि अंधेरी या भागात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.
‘या’ भागात अलर्ट...
ज्यामध्ये मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी, आयएनएस शिकारा यासह सहार विमानतळ पोलिस स्टेशन, कुलाबा पोलिस स्टेशन, माता रमाबाई मार्ग पोलिस स्टेशन आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन या परिसरात पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस ड्रोन, पतंग, छोटे विमान आणि फुग्यांवर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे.
दहशतवादी किंवा असामाजिक घटकाचा ड्रोन किंवा अन्य छोट्या विमानाने हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी ही बंदी घातली आहे. 10 फेब्रुवारी रोजी CST येथे PM मोदी दोन वंदे भारत ट्रेनचे (Vande Bharat Train) उद्घाटन करणार आहेत.
Maharashtra| PM Modi to inaugurate Vande Bharat Express in Mumbai on 10th February. In the wake of PM’s visit, drones & flying activities banned in the jurisdiction of Airport PS, Sahar PS, Colaba PS, MRA Marg PS, MIDC PS & Andheri PS pic.twitter.com/W8BkVDMNuE
— ANI (@ANI) February 6, 2023
वंदे भारत ट्रेनचे होणार उद्घाटन…
दरम्यान, मुंबईहून लवकरच 2 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. एक वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर (Mumbai-Solapur) मार्गावर तर दुसरी मुंबई-शिर्डी (Mumbai-Shirdi) मार्गावर धावेल. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा