मद्यधुंद महिलेचा पबमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, पोलिसांनाही मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

मद्यधुंद महिलेचा पबमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, पोलिसांनाही मारहाण
SHARES

मुंबईच्या (Mumbai Crime) अंधेरी पश्चिमेस असेलल्या एका पबमध्ये (Pub) मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका महिलेनं कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आंबोली पोलीस ठाण्याच्या (Amboli Police Station) हद्दीमध्ये लॉर्ड ऑफ द ड्रिंक (Lord of the Drink) या पब मध्ये ड्रग्जच्या नशेत असलेल्या महिलेकडून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

आंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धिंगाणा करणारी महिला तिच्या दोन मित्रांसोबत लॉर्ड ऑफ द ड्रिंक (Lord of the Drink) या पब मध्ये आली होती. मात्र मध्यरात्री दोन वाजता महिलेने अचानक पब कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

लॉर्ड ऑफ द ड्रिंक या पबच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला होता. आंबोली पोलिसांची गाडी तिथे पोहोचल्यानंतर गाडीवर असलेले सहायक उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांना महिला आणि तिच्या दोन्ही साथीदारांनी कानाखाली मारायला सुरुवात केली.

यानंतर या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती आंबोली पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद यादव हे महिला अधिकारी सोबत बीट मार्शलची गाडी घेऊन पबला पोहोचले. मात्र पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्यावर सुद्धा त्या महिलेने हल्ला केला.

मुकुंद यादव यांच्यादेखील दोन ते तीन वेळा महिलेनं कानशिलात लगावली. त्यानंतर या महिलेने महिला पोलीस अधिकाऱ्याचा चावा घेतला. त्यामुळे महिला पोलीस अधिकारी देखील जखमी झाली. या महिलेच्या हल्ल्यात सात पोलीस अधिकारी आणि तीन हॉटेल कर्मचारी असे 10 लोक जखमी झाले आहेत.

महिलेचा संपूर्ण हाय वोल्टेज धिंगाणा हा पबमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. आंबोली पोलिसांनी लॉर्ड ऑफ द ड्रिंक या पबचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

आंबोली पोलिसांनी मोठा फौज फाटा बोलून महिला आणि तिच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. आंबोली पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदारांची वैद्यकीय चाचणी करून पुढील कारवाईसाठी आंबोली पोलीस ठाण्याला आणले आहे.हेही वाचा

सिद्धीविनायकाच्या नावाने गंडा घालणाऱ्याला अटक

शिक्षकी पेशाला काळीमा! ४ शाळकरी मुलींचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा