कोकेनची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला NCB ने केली अटक


कोकेनची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला NCB ने केली अटक
SHARES

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व काही ठप्प आहे. मात्र असे असतानाही अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा धंदा छुप्या पद्धतीने सुरू आहे. अशाच एका नायझेरियन तस्कराचा NCB च्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. नवाग्वा प्रिन्सविल चिका असे या आरोपीचे नाव आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी त्याच्याजवळून १०.२ ग्रॅम कोकेन, १ बाटली LSD हस्तगत केली आहे.

मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहीती NCB च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार NCB च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एका नायझेरियनला ताब्यात घेतले. त्याच्या अंग झडतीत अधिकाऱ्यांना त्याच्याजवळ कोकेन आणि एलएसडी जे नशा करण्यासाठी वापरता ते सापडले. दरम्यान, आरोपीला आणि त्याच्याकडील जप्त केलेले अंमली पदार्थ त्याने कुठून आणले. याचा एनसीबीचे अधिकारी  तपास करत आहेत. नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट अन्वये पुढील कारवाई करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही अंमली पदार्थ तस्करांचे कारनामे सुरूच असल्याचे यावरून उघड झाले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा