
दुपारी सुमारे 2 ते 2.30 वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. आंघोळीसाठी तलावात उतरलेल्या मुलींना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्या.
मृत मुलींची ओळख हरियाना रमजान परवीन (8), रवीना रमजान परवीन (7) आणि सौम्या कन्हैया प्रजापती (13) अशी झाली आहे. हरियाना आणि रवीना या सख्ख्या बहिणी होत्या. तिघीही जसई गावात राहत होत्या आणि त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशमध्ये आहे.
मुलींच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने तिघींना तलावातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी Indira Gandhi Rural Hospital येथे पाठविण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जसई गावासह संपूर्ण उरण परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा
