नीरव मोदीच्या संपतीचा या दिवशी होणार लिलाव

लिलावाचे मुख्य आकर्षण असणार आहे ते नामकिंत चित्रकारांच्या कलाकृतींचे

नीरव मोदीच्या संपतीचा या दिवशी होणार लिलाव
SHARES

बहुचर्चित पंजाब-नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या महागड्या कार आणि वस्तूंचा २७ फेब्रुवारी आणि ३ व ४  मार्च रोजी लिलाव होणार आहे. या लिलावाचे मुख्य आकर्षण असणार आहे ते नामकिंत चित्रकारांच्या कलाकृतींचे, कोट्यावधी रुपयांच्या या कलाकृती ईडीकडून लिलावात काढल्या आहेत. 

 लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन पीएनबीमध्ये झालेल्या ११ हजार ३६० कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी नीरव मोदी हा सध्या ईडीच्या रडारवर आहे. ईडीने आतापर्यंत निरवची कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. या जप्त मालमत्तेमध्ये निरवच्या वरळी आणि अलिबाग येथील फार्महाऊसवर उभ्या असलेल्या अलिशान कारचा ही समावेश आहे. मंगळवारी ईडीने जप्त केलेल्या कार मध्ये राँईल्स राँयघोस्ट, पोर्चेस पनमेरा, मर्सिडिज, फार्च्यूनर, इनोव्हा अशा ८६ कोटी रुपयांच्या ८ कारसह काही मौल्यवान दागिने हस्तगत केले आहे. आता पर्यंत निरवच्या २९ प्राँपर्टी ईडीने सील ठोकले आहे. त्यामध्ये ५६०० कोटींचे मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.

 गैरव्यवहार प्रकरणात ईडीने जप्त केलेल्या या मालमत्तेचा आता न्यायालयाच्या परवानगीने लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्चला होणार आहे. या लिलावात अमृता शेरगील, एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’ हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकले जाईल, असा अंदाज सॅफ्रनआर्ट संस्थेने व्यक्त केला आहे. एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२’ या चित्राचाही तितक्याच किमतीला लिलाव होईल. त्याखालोखाल व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे लिलावात असतील.

  त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळांसह (लिमिटेड एडिशन) आणि रोल्स रॉईस मोटारीचाही लिलाव करण्यात येणार आहे. नुकतीच ‘ईडी’च्या वतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल, तर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल. हा लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात होणार आहे. 

लिलावाचे आकर्षण

० शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’ हे चित्र

० एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२’

० व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे

० आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळं

० रोल्स रॉईस मोटारीचाही लिलाव



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा