माटुंगा रेल्वे स्थानकावर तरूणीचं चुंबन घेऊन पळ काढणाऱ्या विकृताला पकडून त्याला चोप देत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणारे शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर (shiv sena leader nitin nandgaonkar) आणि दर्शनबीर सिंह सुरजीत यांना अँटाॅप हिल पोलिसांनी (antop hill police) शुक्रवारी अटक केली हाेती. या अटकेनंतर सोमवारी दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली.
रजीवूर खान असं तक्रारदाराचं नाव आहे. त्याने नांदगावकर (shiv sena leader nitin nandgaonkar) आणि सिंह यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी रजीवूर खानला फोन करत त्याला पक्षाच्या कार्यालयात बोलवून घेतलं. तिथं गेल्यावर दोघांनीही त्याला मारहाण करत, त्या मारहाणीचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर अपलोड केला.
कोण आहे हा विकृत?
२६ जानेवारी रोजी पीडित तरुणी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या (matunga railway station) पुलावरून जात असताना पुलावर कोणीही नसल्याचं पाहून रजीवूर खान तरूणीच्या पाठीमागून आला आणि बळजबरीने तिचं चुंबन घेतलं. त्यानंतर लगेचच त्याने तिथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेली तरुणीही तिथून निघून गेली. मात्रा, ही घटना CCTV मध्ये कैद झाली. हे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायारल होत झाल्यानंतर पोलिसांनी रजीवूर खानला अटक केली.
त्याने याआधीही याप्रकारे अनेक महिलांचे विनयभंग केल्याचं चौकशीत पुढं आलं. तसंच त्याच्या नावे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र छेडछाडी बाबत तक्रार देण्यासाठी एकही महिला पुढे न आल्याने त्याला जामीन मिळाला.
त्यानंतर नांदगावकर यांनी त्याला शोधून काढत, चोप दिला आणि अशा विकृत समाजकंटकांना ठोकतच राहणार, महिलांचा मानसन्मान राखला गेलाच पाहिजे, जिथे जिथे माझ्या गोरगरीब जनतेवर अन्याय होईल, तिथे तिथे मी पोचण्याचा प्रयत्न करत राहणार, असा मजकूर लिहित त्याचा व्हिडिओ फेसबुकवर टाकला.