घाटकोपरमध्ये तेल व्यापा-्याची हत्या

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये तेल व्यापा-्याची  हत्या

अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका तेल व्यापाऱ्याचा मृतदेह शुक्रवारी रात्री  आढळून आल्याने घाटकोपर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. योगेश गुप्ता असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांचा घाटकोपर परिसरात तेलाचा व्यवसाय आहे.

घाटकोपर पश्चिम येथील नीलकंठ टॉवर परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने त्यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. योगेश गुप्ता यांच्या खिशातील रोख रक्कम आणि अंगावरील दागिने देखील गायब असल्याची माहिती पंकज गुप्ता या त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. घटकोपर पोलीसांनी केवळ घटनेची नोंद केली असून शविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

Loading Comments