'कमल हटाओ, कमल जलाओ'

 Mandala
'कमल हटाओ, कमल जलाओ'
'कमल हटाओ, कमल जलाओ'
'कमल हटाओ, कमल जलाओ'
See all

मानखुर्द - नववर्षाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाईट प्रवृत्तीचं प्रतीक असलेल्या ओल्डमनसह कमळाच्या प्रतिमेचं दहन केलं. या वेळी 'कमल हटाओ कमल जलाओ' च्या घोषणाही दिल्या. नुकतेच कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सुधीर नवले यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे भारतासह जगभरात 2016 हे वर्ष नेहमी लक्षात ठेवलं जाईल, असंही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले. तर नवीन वर्षात मोदी सरकारचा विरोध करत सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करेल असा निर्धार या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

Loading Comments