'मौत का खेल' कधी थांबणार ?

 Mandala
'मौत का खेल' कधी थांबणार ?
'मौत का खेल' कधी थांबणार ?
See all

मानखुर्द - शिवाजीनगर येथे रविवारी रिक्षाला आग लागून एकाच घरातील आठ जण जखमी झाले. तर यामध्ये एक मुलीगी दगावली. तरीही रिक्षाचालक एका रिक्षात चार ते पाच जणांना बसवून अवैध वाहतूक करत आहेत. मात्र आरटीओ, वाहतूक नियंत्रण कक्ष आणि पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात मानखुर्द वाहतूक नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. जी. इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिला. यावरून शासन परत एकदा अपघात घडून मोठी जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Loading Comments