
ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी अवघ्या दोन-अडीच महिन्यांत AI-आधारित Intelligent Traffic Management System (ITMS) च्या मदतीने तब्बल 30,085 वाहतूक नियमभंग पकडले आहेत.
कॅडबरी जंक्शन येथे सर्वाधिक नियमभंग सिग्नल जंपिंगचे 18,165 इतकी प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
1 सप्टेंबर ते 17 नोव्हेंबर या काळात हेल्मेटशिवाय वाहन चालवणे हे 10,611 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर स्टॉप-लाइन नियमभंग 815 प्रकरणे आणि ट्रिपल सीट प्रवास 494 प्रकरणे नोंदली गेली.
मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण दंडाची रक्कम 30.8 लाख रुपये इतकी आहे.
24x7 कार्यरत असलेल्या हाय-डेफिनिशन कॅमेर्यांना ट्रॅफिक पोलिसांचे “तिसरे डोळे” म्हटले जाते आणि त्यांनी पकडलेल्या प्रत्येक वाहनचालकाला ई-चलान जारी करण्यात आले.
सप्टेंबर: 16,709 नियमभंग
ऑक्टोबर: 9,082 नियमभंग
नोव्हेंबर (17 तारखेपर्यंत): 4,294 नियमभंग
ITMS सुरू झाल्यापासून नियमभंगांमध्ये स्पष्ट घट दिसून आली आहे.
ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी शिस्त सुधारण्यासाठी आणि नियमभंग रोखण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी कॅडबरी जंक्शन येथे ITMS सक्रिय केले.
