मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ११ वर्षे तुरूंगवास


मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ११ वर्षे तुरूंगवास
SHARES

मुंबईवरील २६/११ दहशतवादी (26/11 mastermind) हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला (hafiz saeed) पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवत ११ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने पाकिस्तानी न्यायालायने (pakistan court) सईदला दोषी धरलं. 

दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणातील सर्व खटले एकत्र करून त्याची एकत्रित सुनावणी घेऊन निकाल जाहीर करावा, अशी विनंती करणारा अर्ज जमात उद दवाचा प्रमुख हाफिज सईद (hafiz saeed) याने लाहोर येथील दहशतवाद विरोधी न्यायालयात (anti terrorism court) केला होता. त्यानुसार दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद हुसेन भुट्टा यांनी गेल्या आठवड्यात सईद याच्या विरोधातील २ खटल्यांचा निकाल राखून ठेवला होता. 

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर (hafiz saeed) कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्यानंतर चॅरिटी संस्थेच्या माध्यमातून पैसे जमा करत हे पैसे दहशतवादी कारवायांसाठी पुरवत असल्याबद्दल सईफ आणि त्याच्या १२ साथीदारांविरोधात पाकिस्तान सरकारने गुन्हा दाखल केला होता. त्याला लाहोर इथून अटक करण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने (uno) त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं होतं. लष्कर ए तोयबा, जमात-उद-दावा, तसंच त्यांच्याशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (fif) या धर्मादाय संस्थेने केलेल्या दहशतवादी कारवाया, त्यांना पुरविलेली आर्थिक रसद याची चौकशी पाकिस्तानने करावी, असा दबाव जागतिक समुदायाने आणला होता. हाफिजवर कारवाई न झाल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (ftf) दिला होता. अखेर या दबावापुढं पाकिस्तान झुकला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा