अनधिकृत 'टेलिफोन एक्सचेंज'चा पर्दाफाश पाकिस्तानी गुप्तहेरास मुंबईतून अटक

आर्मीच्या हालचालींची माहिती द्याचया, तो प्रामुख्याने दुबई, पूच्छ आणि राजोरी परिसरातील माहिती या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने पाकिस्तानमध्ये पुरवायचा,

अनधिकृत 'टेलिफोन एक्सचेंज'चा पर्दाफाश  पाकिस्तानी गुप्तहेरास मुंबईतून अटक
SHARES

मुंबईच्या गोवंडी परिसरातून गुन्हे शाखा 6 च्या पोलिसांनी एका गुप्तहेरास अटक केली आहे. गोवंडीतील त्याच्या घरातून पोलिसांनी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज हस्तगत केले आहेत.


अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज द्वारे हा गुप्तहेर जम्मू काश्मिरमधल्या, आर्मीच्या हालचालींची माहिती द्याचया, तो प्रामुख्याने दुबई, पूच्छ आणि राजोरी परिसरातील माहिती या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने पाकिस्तानमध्ये पुरवायचा,  याबाबत जम्मू काश्मिर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला कळवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 191 सिम कार्ड असलेली टेलिफोन एक्सचेंज मशीन, लँपटाँप, मोबाइल आणि इतर साहित्य हस्तगत केली आहेत. या आरोपीचा ताबा आता 'एनआयए' तपाय यंञणेकडे सोपवण्यात आला आहे. या पूर्वी चेंबूर आणि त्या परिसरात अशा प्रकारच्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालवणाऱ्यांवर कारवाई केली होती.

कसा करतात वापर

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमध्ये सिमबॉक्स इंटरनेट कनेक्शनला राउटरच्या माध्यमातून जोडले जातात आणि परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल राऊट करून भारतातील मोबाइल नंबर किंवा लॅण्डलाइनशी जोडले जातात. एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कॉलचे डोमॅस्टिक कॉलमध्ये रूपांतर केले जातात. हा फसवणुकीचा प्रकार असून भारताची कोणतीही सुरक्षा यंत्रणा हे आंतरराष्ट्रीय कॉल पकडू शकत नाही. डिओटीकडेही या कॉलची नोंद होत नसल्याने सरकारच्या सुरक्षा यंञणांना ही काही कळून येत नाही. टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने ही प्रणाली अवैध घोषित केली आहे. आतापर्यंतच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बॅस्टेड एक्सचेंजेसमुळे देशाच्या दूरसंचार विभागाचे कोटय़वधींचे नुकसान झाले.
संबंधित विषय