परमबीर सिंग यांनी भरला ५० हजाराचा दंड

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांनी भरला ५० हजाराचा दंड
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अखेर चांदीवाल आयोगाने ठोठावलेला 50 हजार रुपयांचा दंड भरला आहे चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्रं सादर न केल्याने परमबीर सिंग यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. हा दंड त्यांना मुख्यमंत्री कोव्हिड निधीत जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी हा निधी जमा केला.

चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांना तीन वेळा दंड ठोठावला होता. आधी 5 हजार रुपये, नंतर 25 हजार रुपये आणि त्यानंतर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानुसार सिंग यांनी अखेर ही रक्कम जमा केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. 

याबाबत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जबाब नोंदवला आहे. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी स्वतः सचिन वाझेचा जबाब नोंदवला. मात्र, सिंग यांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा