भरधाव मालवाहू ट्रकच्या धडकेत तरुण ठार

wadala
भरधाव मालवाहू ट्रकच्या धडकेत तरुण ठार
भरधाव मालवाहू ट्रकच्या धडकेत तरुण ठार
See all
मुंबई  -  

वडाळा - आणिक डेपोहून प्रियदर्शनीकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने धडक दिली. वडाळ्याच्या भगवान स्वामी नारायण उड्डाणपुलावर सोमवारी ही घटना घडली. यात दुचाकीस्वार मयूर विष्णू पोळ (वय - 21) जागीच ठार झाला. मयूर वडाळा पूर्व येथील नाडकर्णी पार्क बीपीटी वसाहतीत राहत होता.

मयूर पोळ आपल्या वैयक्तिक कामासाठी सकाळीच घराबाहेर पडला होता. दुपारच्या वेळेत आपले काम आटपून घराकडे निघालेल्या मयूरवर काळाने घाला घातला. मालवाहू ट्रकची धडक बसताच दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली आणि मयूर ट्रकच्या खाली आला. त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक मंगेश सिताराम यादव (वय - 49) याला अटक करून मालवाहू ट्रक ताब्यात घेतला. वडाळ्याच्या भगवान स्वामी नारायण उड्डाण पुलाचे वळण अतिशय धोकादायक बनले असून आत्तापर्यंत दहापेक्षा जास्त लोकांचा या उड्डाण पुलावरील वळणावर जीव गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.