चोरीच्या गाड्या अपग्रेड करण्याच्या नादात पोहचले जेलमध्ये


चोरीच्या गाड्या अपग्रेड करण्याच्या नादात पोहचले जेलमध्ये
SHARES

चोरीच्या गाड्यांची चेसी आणि इंजिन नंबर बदलून विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. एका नामांकित शोरुमच्या मालकाला या दोघांच्या फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर त्याने याबाबत तक्रार नोंदवली होती.संपूर्ण प्रकार

सध्या बाजारात होंडा अॅक्टीव्हाच्या नव्या गाड्यांची चलती आहे. त्यातच होंडा अॅक्टीव्हा ३जी आणि होंडा अॅक्टीव्हा ४जी या नव्या गाड्यांसाठी ग्राहक आग्रही आहेत. ग्राहकांची हीच आवड लक्षात घेत जुन्या गाड्या अपग्रेड करून देण्याच्या नावाखाली वांद्र्यातील आरिफ आणि साहिल हे दोघे मॅकेनिक अनेकांची फसवणूक करायचे. जुन्या गाड्या घेत, रस्त्यावरील नव्या चोरीच्या गाड्यांची चेसी आणि इंजिन त्या गाड्यांना बसवून बक्कळ पैसे कमवत होते.

अवघ्या काही हजारात गाडी नवी करून मिळत असल्याने दोघांच्या गॅरेजबाहेर लोकांची रिघच लागायची. या दोघांच्या फसवणुकीची माहिती वांद्र्यातील होंडा शोरुमच्या मालकाला लागली होती. त्यानुसार त्याने कंपनी, नागरिकांची आणि सरकारची होणारी फसवणूक लक्षात घेत वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. कालांतराने या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन पुढे हा गुन्हा शाखा ९ च्या पोलिसांकडे वर्ग केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना अटक करत आतापर्यंत या दोघांकडून चोरीच्या २१ दुचाकी हस्तगत केल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे.

संबंधित विषय