पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा बनाव


पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्येचा बनाव
SHARES

अल्पवयीन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नूरजहाँ(१७) असं मृत विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी इरफान उर्फ रफिक उल्ला खान आणि राजिया उर्फ बटकी खान यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ मे पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

कुर्ला परिसरात राहणाऱ्या इरफानने नूरजहाँशी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. विवाहानंतर नूरजहाँ, इरफान आणि त्याची आई राजिया हिच्यासोबत कुर्लाच्या परिघवाडी, बाबा स्टिलवाली चाळीत रहात होती. मात्र काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडू लागले. त्यावेळी नूरजहाँच्या चारित्र्यावर संशय घेत इरफान तिला मारहाण करायचा. गुरुवारी रात्री या दोघांमध्ये झालेल्या वादातून रात्री झोपेत इरफान आणि राजियाने नूरजहाँची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर या हत्याप्रकरणातून वाचण्यासाठी दोघांनी तिच्या गळ्यात ओढणी अडकवून नूरजाहाँने गळफास घेत आत्महत्या केल्याचं भासवले.


दोघांनी दिली हत्येची कबुली

या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत, नूरजहाँचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्या अहवालात नूरजहाँला मारून तिने आत्महत्या केल्याचं भासवण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांकडे कसून चौकशी केली असता. दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा