सीसीटीव्हीमुळे चोर महिलेची पोलखोल

दादर - मुंबईतल्या प्रसिद्ध असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात एक महिला चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उषा असं या महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला अटक केलीय. मंदिरात दर्शन घेण्याच्या बहान्यानं आलेल्या उषानं हात चलाखी करत एका महिलेची बॅग लंपास केली. मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानं तिला पोलिसांनी अटक केलीय. सध्या मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे मुंबईकरांनो सावध व्हा. मंदिरात गर्दीचा फायदा घेऊन तुम्हाला लुबाडणारे खुप आहेत.

Loading Comments